दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
यवतमाळ जिल्ह्यांतील वनी तालुक्यांतील मुधोनी येथील गावचे सुपुत्र ले. कर्नल वासुदेव आवारी अरुणाचल प्रदेश येथे भारत-चीन सीमेवर कर्तव्यावर असताना त्यांना श्वांस घेण्यांस त्रांस झाल्यांने त्यांना तातडीने लष्करी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्यावर गुरुवारी सायंकाळी त्यांच्या मूळगावी मुधोनी या गावांमध्ये गुरुवारी रात्री उशिरा पार्थिंव दाखल झाले. त्यांच्यावर मुधोनी येथील सामुदायिक प्रागणांत झालेल्या अंत्यसंस्कारांला आर्मीचे अधिकारी,पोलीस अधिकारी उपविभागीय अधिकारी,तहसीलदार व लोकप्रतिनिधी यांच्यासह वणी आणि परिसरांतील गावांतील हजारोंचा जनसागर उपस्थिंत होता. भावपूर्ण व शोकाकुल वातावरणात झालेल्या अंत्यसंस्कारांवेळी उपस्थिंत नागरिकांना अश्रूं झाले. त्यांच्या पार्थिवांचे राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अंतदर्शन घेतले. यावेळी गावांतून अंतयात्रा निघाली यावेळी भारत माता की जय अमर रहे अमर रहे वासुदेव आवारी अमर रहे अशा जय घोषणांची गुंज संपूर्ण गावातून ऐकू येत होती. अंतयात्रा जाताना घराघरांतून त्यांच्या पार्थिंवावर फुलांचा वर्षाव करीत श्रद्धांजली वाहण्यांत आली. अंत्ययात्रेनंतर सामुदायिक प्रांगणात त्यांचे पार्थिव नेण्यांत आले. हजारोंच्या जनसागरांमध्ये सुरुवातीला लष्करी विभागाकडूंन सलामी देण्यांत आली त्यानंतर पोलीस विभागांतर्फे सलामी देवुन हवेमध्ये गोळीबार करुन त्यांना मानवंदना देण्यांत आली.