
दैनिक चालू वार्ता
पंढरपूर प्रतिनिधी
सुधीर आंद
संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज या दोन पालखी मार्गांचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपन्न झाला .या प्रसंगी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांच्या सह इतर विविध संतांचे अभंग म्हणत म्हणत वारकरी संप्रदाय व वारीच्या परंपरेचे महत्त्व सांगत ,संतांचे आशीर्वाद घेत पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित संत मंडळींसह सर्वांचेच मन जिंकले. पंढरपूरकरांसह पालखी मार्गांवरील सर्व गावांकडे 3 महत्वाचे आशीर्वाद मागितले आहेत
हडपसर,जेजुरी,मोहोळ पर्यंत असणारा श्री संत ज्ञानेश्वर महाराज तर पाटस,बारामती,तोंडले-बोंडले पर्यंत असणारा संत तुकाराम महाराज या दोन्ही पालखी मार्गांचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला.या प्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री वी.के.सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,राज्यपाल भगतसिंग कोषयारी,पालकमंत्री दत्तात्रय भरणे,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील,माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील,खा.जयसिद्धेश्वर महास्वामीजी,खा. रणजितसिंह निंबाळकर,खा.ओमराजे निंबाळकर,आ.प्रशांतपरिचारक,आ.समाधान आवताडे यांच्यासह पुणे, सातारा,सोलापूर जिल्ह्यातील आमदार व सर्व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी सुरुवातीला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे भाषण झाले.महाराष्ट्रासह देशातील सर्व धार्मिक ठिकाणे चांगल्या व सुसज्ज रस्त्याने जोडले जात असल्याचे सांगत. धार्मिक क्षेत्रांना येण्या जाण्याचा प्रवास सुखकर व्हावा दळणवळण सुविधा वाढावी हा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारत सरकार पूर्ण करत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. पालखी मार्गांसाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात निधी दिला असून वारकरी भक्तांसाठी पालखी मार्गाच्या शेजारूनच एक सुखकर रस्ता निर्माण करण्यात येणार असून त्या रस्त्यावर चालत असताना भाविकांच्या पायांना कोणतीही इजा होणार नाही या करिता सुसज्ज मुलायम रस्ते तयार करून त्या ठिकाणी गवताचे लॉनही टाकले जाणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलेल्या सर्व मागण्या राज्य सरकार पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत वारकरी भाविक भक्तांसाठी मोठ्या प्रमाणात विकास कामे राबवून महाराष्ट्राला एक चांगले वैभव मिळवून देणारा असल्याचे सांगितले.
आ. प्रशांत परिचारक यांच्या पाठपुराव्याला यश
पंढरपूरकरांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारा असून वाखरी ते पंढरपूर व विठ्ठल मंदिरा पर्यंतचा 7 ते 8 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 74 कोटी रुपये देणार असल्याची घोषणा यावेळी मंत्री गडकरी यांनी केली त्यामुळे आ. प्रशांत परिचारक यांच्या पाठपुराव्याला हे सर्वात मोठे यश आले असल्याचे पहावयास मिळाले.
यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, वारी हे समतेचे प्रतीक आहे असून माझे माहेर पंढरी आहे,आहे भीवरेच्या तीरी असे सांगत त्यांनी माझे पंढरपूर सोबत 2 अतूट असल्याचे सांगितले.यामध्ये पाहिले नाते असे मी, वाराणसी चा असून भगवान श्रीकृष्णाचा तेथे वास्तव्य आहे,तर काशी हे माझे आवडते तीर्थक्षेत्र आहे आणि पंढरपूर हे दक्षिण काशी आहे.असे मोदी यांनी सांगितले.जवळपास 30 ते 35 मिनिटं सुरु असलेल्या भाषणामध्ये मोदींनी अनेकदा आवर्जून मराठीमधून वारकरी संप्रदायातील अभंग,काव्य यांचा उल्लेख करत करत उपस्थितांचे मन जिंकले. पंढरपूर प्रति आम्हाला एक वेगळी आस्था आहे आणि आम्ही पंढरपूर साठी काहीही कमी पडू देणार नसल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालखी मार्गावरील असणाऱ्या गावांनी पालखी मार्गाच्या दुतर्फा झाडे लावावीत, वारकरी भाविक भक्तांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे व पंढरपूर देशातील सर्वात पहिले निर्मल क्षेत्र बनवावे असे 3 आशीर्वाद पंतप्रधान मोदी यांनी मागितले.स्व.पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “निर्मल वारीचा”उल्लेख करून वारकरी भाविक भक्तांचे मोठे कौतुक केले. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो हा अभंग गात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंढरपूर साठी आम्ही सदैव काम करत राहणार असल्याचे अभिवचन याप्रसंगी उपस्थितांना दिले.
याप्रसंगी आ. सुभाष देशमुख,विजयकुमार देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील,माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,आ.राजेंद्र राऊत,राम सातपुते,सचिन कल्याण शेट्टी, सोलापूर महानगरपालिकाच्या महापौर श्रीकंचना यन्नम,जि.प.अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे,सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, सोलापूर शहर विक्रम देशमुख यांच्या सह मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायातील मान्यवर संतमंडळी,पालखी सोहळा प्रमुख व नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचा आ. प्रशांत परिचारक व आ. समाधान आवताडे यांनी तुळशीहार व वीणा देऊन जाहिर सत्कार केला.