दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी-राजेश गेडाम
युवक काँग्रेसचे हल्लाबोल
भंडारा : – नरेंद्र मोदींचा जन्मदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून घोषित करावा. महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन सादर.
१७ सप्टेंबर २०२१ रोजी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्यात आले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्याकरिता प्रत्येक वर्षी सुशिक्षित बेरोजगारांना दोन करोड रोजगार देण्याचे आश्वासन दिले. परंतु सत्तेत आल्यानंतर सात वर्ष लोटून सुद्धा बेरोजगारांना रोजगार देण्याऐवजी, अनेकांना रोजगारापासून मुकावे लागले. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सुशिक्षित बेरोजगारांना पकोडे विकण्याचा सल्ला दिला. त्यामुळे जिल्हाधिकारी भंडारा यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती भारत सरकार यांना १७ सप्टेंबर या दिवसाला बेरोजगार दिन म्हणून घोषित करावे, यासंबंधी निवेदन युवक काँग्रेसतर्फे देण्यात आले. यात पायी मोर्चा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राकेश कारेमोरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. मोर्चात घोषणाबाजी करण्यात आली, युवकांना रोजगार मिळावा याकरिता आक्रोश व्यक्त करण्यात आला, तसेच बेरोजगार झालेल्या युवकांना त्वरित रोजगार देण्यात यावे तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यावे अशी मागणीसुद्धा करण्यात आली. त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला लॉलीपॉप चारून वाढदिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी भंडारा विधानसभा युवक युवक काँग्रेसचे अध्यक्ष भुषण टेंभुर्णे, मुकुंद साखरकर महासचिव भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी, प्यारेलाल वाघमारे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी भंडारा, पवन वंजारी अध्यक्ष भंडारा जिल्हा एनएसयूआय,सचिन फाले उपाध्यक्ष भंडारा विधानसभा युवक काँग्रेस, शाहीन मून शहर अध्यक्ष युवक काँग्रेस भंडारा, कमल साठवणे युवक काँग्रेस भंडारा सोशल मीडिया प्रमुख,अनिक जमा पटेल जिल्हा महासचिव भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी, धनराज साठवणे इंटक अध्यक्ष भंडारा जिल्हा , प्रशांत देशकर शहर अध्यक्ष कॉंग्रेस कमिटी भंडारा, मंगेश हुमणे जिल्हा सचिव भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी, जय डोंगरे, चांद डोंगरे,आनंद चिंचखेडे, साहिल मेश्राम, निखिल तिजारे, सुनील सुखदेवे, मंगेश वंजारी, संदेश श्यामकुवर, शालिक भुरे, तनुष शहारे, विनीत देशपांडे, दिलीप मडावी, जनार्दन निंबार्ते, राहुल राऊत, मोहित गडकरी, निखिल आगलावे, नंदू थोटे, विजय बनसोडे, देवनाथ मदनकर, उल्हास भुरे, मुन्ना भोंगाळे, रामरतन मंडाले, हिमांशू डोरले, अभय मंडाले, महेश भामरे, मुकेश राघोर्ते, होमदेव सिडाम, समीर तायवाडे, सुरज डोंगरे, शुभम गोंडाने, प्रणय नेवारे, सचिन सावलकर, निखिल आगलावे तसेच युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व युवक काँग्रेसचे महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.