
दै चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई :विराटच्या टेस्ट कारकिर्दीची सुरूवात साधारण झाली होती. त्यानं वेस्ट इंडिज विरुद्ध 2011 साली पहिल्या तीन टेस्टमध्ये फक्त 76 रन काढले होते. विराट कोहली हा क्रिकेटच्या तीन्ही फॉर्मेटमधील सर्वोत्तम बॅटरपैकी एक आहे. टीम इंडियाच्या बॅटींगचा आधार असलेल्या विराटच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत.पण विराटची टीम इंडियातून हकालपट्टी होणार होती, असा खुलासा टीम इंडियाचा माजी व्हाईस कॅप्टन वीरेंद्र सेहवाग नं केला आहे. सेहवागनं याचा किस्सा सांगितला आहे.
त्यामुळे त्याला टीममधून वगळण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला बराच काळ बेंचवर बलावं लागलं. त्याचवर्षी ऑस्ट्रेलियाच्य दौऱ्यावर विराटला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळाली. त्या दौऱ्यातही विराटची कामगिरी साधारण होत होती.टीम इंडियाच्या अन्य बॅटर्सप्रमाणे विराटही रन काढण्यासाठी संघर्ष करत होता. ‘पर्थमध्ये 2012 साली होणाऱ्या टेस्टपूर्वी विराटच्या जागी रोहित शर्माला खेळवण्याची निवड समितीची इच्छा होती. त्यावेळी मी टीमचा व्हाईस कॅप्टन तर धोनी कॅप्टन होता. आम्ही विराटला पाठिंबा दिला.त्यानंतर काय घडलं तो इतिहास सर्वांच्या समोर आहे.’ असं सेहवागनं सांगितलं. धोनी आणि सेहवागनं दिलेला पाठिंबा हा विराट कोहलीच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर त्याला एकदाही टेस्ट टीममधून वगळण्यात आलं नाही.