
दै. चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
राष्ट्रीय युवा पुरस्कार सन २०१९-२० साठी नामांकन अर्ज / प्रस्ताव हे https://innvate.my gov. in/national : youth : award – २०२०/ या पोर्टलवर आॅनलाईन पध्दतीने पाठविण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयाने केले आहे. ज्या व्यक्तीना नामांकनांसाठी अर्ज सादर करावयाचा आहे. त्यांनी प्रथम तो प्रस्ताव आॅनलाईन भरावयाचा आहे. हे नामांकन केंद्र शासनाकडे १८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत आॅनलाईन अचूक भरून पाठवावेत या प्रस्तावाच्या दोन सारख्या प्रती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड येथे १८ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी १२:३० वाजेपर्यंत सादर करावेत, असेही आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. राजेश्वर मारावार यांनी केले आहे.