
दै चालु वार्ता वृत्तसेवा
लखनऊ : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील, त्याच जागेवरून आपण निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. यूपी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे.यापूर्वी २०१९ मध्ये वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. मात्र, त्यांनी माघार घेतली होती.
“मी पंतप्रधानांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला पण त्यावेळी माझ्याकडे माझा पक्ष नव्हता, त्यामुळे मी तसे केले नाही. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी मला विरोधी मतांचे विभाजन करण्याऐवजी मी त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा देणे चांगले राहील, असं सांगितलं,” असं चंद्रशेखर आझाद एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.