
दै चालु वार्ता वृत्तसेवा
मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा गंभीर इशारा
नवी दिल्ली : सत्यपाल मलिक म्हणाले, “सैन्याचे दोन जनरलने सांगितलं की शेतकरी आंदोलन भारतीय सैन्य दलावरही परिणाम करत आहे. त्यामुळे काहीही होऊ शकतं. आज तुम्ही सत्तेच्या खुर्चीवर आहात, अहंकारात काहीही करत आहात. मात्र, याचे काय पडसाद पडतील हे तुम्हाला माहिती नाही.””कारगिली युद्ध झालं तेव्हा शेतकऱ्यांची २० वर्षांची मुलं पर्वतावर चढली. शत्रू कारगिलमध्ये घुसला ही सरकारची चूक होती असं मला वाटतं. मात्र, याची किंमत शेतकऱ्यांच्या मुलांना चुकवावी लागली. हा अन्याय शेतकऱ्यांसोबतच होत आहे. लोक यावर प्रतिक्रिया देत आहेत मात्र एक दिवस यावर शेतकऱ्यांची तीव्र प्रतिक्रिया उमटू नये असं मला वाटतं. आतापर्यंत शेतकऱ्यांनी दगड उचललेला नाही,” असंही मलिक यांनी नमूद केलं. मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शेतकरी आंदोलनाचा परिणाम थेट भारतीय सैन्य दलावर होत असल्याचा गंभीर इशारा दिलाय.सैन्याच्या दोन जनरल पदावरील अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.तसेच काहीही होऊ शकतं, असा इशारा दिल्याचं मलिक यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी कारगिल युद्धाच्यावेळी सरकारच्या चुकीची किंमत शेतकऱ्यांच्या मुलांना चुकवावी लागली असल्याचाही आरोप केला. ते तेजा फाऊंडेशनने आयोजित केलेल्या जयपूरमधील जागतिक जाट संमेलनात बोलत होते.तसेंच
शेतकरी आंदोलनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतल्याचं सत्यपाल मलिक यांनी सांगितलं. ते म्हणाले, “मी खूप दुखावलो होतो आणि रागावलो होतो. मी पंतप्रधान मोदींना भेटलो आणि त्यांना ते परिस्थितीचं चुकीचं आकलन करत असल्याचं सांगितलं. या शिख किंवा जाटांना पराभूत करता येणार नाही. तुम्हाला वाटतं हे शेतकरी सहजपणे निघून जातील, पण तसं होणार नाही. त्यांच्या मागण्या मान्य करा. त्यांच्यासोबत दोन गोष्टी कधीही करू नका. एक त्यांच्यावर बळाचा वापर करू नका आणि दुसरं त्यांना मोकळ्या हाती पाठवू नका. कारण ते शेकडो वर्षे असं वर्तन विसरत नाहीत.” असे त्यांनी यावेळी सांगितले