
दै चालु वार्ताचे मुख्य संपाद यांनी खा. प्रताप पाटील चिखलीकर यांची परखड मुलाखत घेतली !
दैनिक चालु वार्ता कंधार-लोहा विशेष प्रतिनिधी ( ओंकार लव्हेकर).
नांदेड : नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर यांची दैनिक चालू वार्ताचे संपादक डी.एस .लोखंडे पाटील यांनी त्यांच्या नांदेड येथील संपर्क कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन परखड अशी मुलाखत घेतली मुलाखती दरम्यान आदरणीय खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अतिशय परखडपणे संपादक यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक आणि मुद्देसूद अशी उत्तरे दिली.
सदरील मुलाखती दरम्यान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांचा राजकीय प्रवास कसा झाला .त्यांनी त्यांच्या गावातील राजकारणापासून तसेच ग्रामपंचायत ते खासदार कसा प्रवास झाला याबाबत सविस्तर अशी मुलाखत दिली. सदरील मुलाखत ही लवकरच दैनिक चालू वार्ता या युट्युबचॅनल वर लवकरच प्रकाशित होणार आहे अशी माहिती दैनिक चालू वार्ताचे संपादक डी.एस लोखंडे पाटील यांनी सांगितले आहे.
आदरणीय खासदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले मी एकूण पंधरा निवडणूक लढल्या पण पंधरापैकी मी 14 निवडणूक ह्या निवडून आलो आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणूक ही अतिशय संघर्षाची असते .पण कितीही संघर्ष झाला तरीही यश हे अटळ आहे. माझ्या नावाप्रमाणेच माझ्या नावातच प्रताप हा दडलेला आहे. त्यामुळे संघर्ष करणे हे काही माझ्यासाठी नवीन नाही. पण मी कितीही संघर्ष केला व प्रतिस्पर्ध्याने विरोध केला तरीही मी त्याला घाबरत नाही. कारण ही जनता माझ्या पाठीशी आहे. जोपर्यंत जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे तोपर्यंत मी जनतेची सेवा करतच राहणार अशी स्पष्टोक्ती त्यांनी त्यांच्या मुलाखतीदरम्यान दिली.
सदरील अर्ध्या तासाच्या मुलाखती दरम्यान त्यांनी मागील व चालू राजकारणाचा इतिहास सांगितला.
सदरील मुलाखत घेत असताना अतिशय साध्या संयमी व हसतमुखाने त्यांनी जी मुलाखत दिली. ती शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे. कारण ते खासदार असून सुद्धा त्यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा असा अविर्भाव आढळत नव्हता. त्यामुळे मुलाखतीमध्ये रंगतदार पणा तयार झाला होता.
सदरील मुलाखत घेण्यापूर्वी त्यांच्या कार्यालयात भरपूर कार्यकर्ते त्यांना दिवाळी दरम्यान भेटण्यास आली होती .तरीही त्यांनी कुठलीच आडकाठी न आणता बिलकुल वेळ नसतानासुद्धा त्यांनी ही मुलाखत दिली हे विशेष !
प्रताप पाटील चिखलीकर म्हणजे सद्यस्थितीत नांदेड चे नंबर 1 चे नेते आहेत. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. कारण भेटण्यापूर्वी जी आमच्या टीम ची मनस्थिती होती व भेटल्यानंतर जी मनस्थिती झाली याला आनंदाचा पारावार नव्हता. कारण एक खासदार माणूस अतिशय साध्या पद्धतीने ही मुलाखत देतील असे वाटलेच नाही. पण जेव्हा त्यांची मुलाखत घेतली त्यांनी जो अतिशय सर्वसामान्य व्यक्तीला आदर दिला . त्याबद्दल आमचे संपादक व चालू वार्ताची आमची टीम यांनी मनापासून प्रताप पाटील चिखलीकर यांचे आभार व्यक्त केले.
मुलाखती दरम्यान आदरणीय खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी ग्रामपंचायतचे सरपंच जिल्हा परिषद सदस्य आमदार तसेच खासदार या सर्व निवडणुकीमध्ये मला खासदारकीची निवडणूक ही अतिशय सोपी गेली असे मत व्यक्त केले.
पण मुलाखती दरम्यान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या शब्दातून मी जनतेचा, जनता माझी ! जनतेची समस्या ,ही माझी समस्या आहे .
असे जाणवत होते.
खासदार आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर यांच्याभोवतीच नांदेड जिल्ह्याचे राजकारण हे सातत्याने फिरत असते पण चिखलीकर हे एक असे नेते आहेत .की त्यांना सर्वसामान्य माणूस हा सरळ भेटू शकतो. त्याला कसल्याही प्रकारचे मध्यस्थी माणूस लागत नाही . त्या व्यक्तीचे तो त्या पक्षाचा असो किंवा नसो त्याचे निसंकोच सरळ असे काम करून देतात .यात त्यांचा हातखंडा नांदेड जिल्ह्यातील फार कमी प्रमाणात नेते आहेत .त्यापैकी प्रताप पाटील चिखलीकर यांचे नाव अग्रगण्याने घ्यावे लागेल यात शंकाच नाही.