
दै. चालु वार्ता
अंबाजोगाई प्रतिनिधी
आप्पासाहेब चव्हाण
बर्दापूरयेथील माळी गल्लीतील श्री हनुमान मंदिरात ८ नोव्हेंबर रोजी कलशारोहणाचा कार्यक्रम ह. भ. प दिनकर बाबा नायगावकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांचे काल्याचे किर्तन झाले. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते.
७ नोव्हेंबर रोजी रात्री विनायक महाराज काचगुंडे यांचे किर्तन झाले. यावेळी सरपंच सुधाकर सिनगारे, मुरलीधर चिंचोळे, रंगनाथ चिंचोळे, पंढरी घोडके, मुकुंद अप्पा सिनगारे, संभाजी सिनगारे यांनी सर्व कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.