
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी
श्री.रमेश राठोड आर्णी
सावळी सदोबा:-आर्णी तालुक्यातील मौजा सुभाषनगर या गावातील स्मशानभूमीची अंत्यत दुरवस्था झाली असून,पावसाळ्यामध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना नागरिकांना कसरत करावी लागते,जन्माला आल्यानंतर मृत्यू अटळ आहे,मुत्यु झाल्यानंतर मुत्यदेहावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पाडले जातात,मात्र मौजा सुभाषनगर येथील स्मशानभूमीची आज अत्यंत दुरवस्था झाल्याचे चित्र आहे,स्मशानभूमी परिसरात मोठमोठी झुडपे वाढली आहे,पथदिवे नाहीत,अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातलगाला बसायला व्यवस्था नाही,ईतकेच नव्हे तर समशानभूमी कडे श्रीमंत असो की गरीब शेवटी या ठिकाणी त्यांचा प्रवास संपतो,याच ठिकाणी त्याचा शेवट करावा लागतो,त्याच्या शेवटच्या क्षणी होणारी अंतिम क्रिया योग्य तऱ्हेने चांगले व्हावी,त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना मित्रमंडळींना समशान बसण्यासाठी व्यवस्था व्हावी,मात्र जि.प. प्रशासनामार्फत दहन व दफन भूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षापासून हाती घेण्यात आली असली तरी, ग्रामीण भागातील अनेक गावातील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झालेली असून स्मशानभूमीत त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी गावात नागरिकांना अडचणी येतात