
औरंगाबाद,दै चालु वार्ता
प्रतिनिधि मोहन आखाडे
शहरात महानगरपालिका अंतर्गत सुरु असलेल्या विविध विकासकामांचा व प्रकल्पांचा आढावा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला. यावेळी स्व.बाळासाहेबा ठाकरे स्मारक स्मृतीवन औरंगाबाद सफारी पार्क, औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन सातारा देवळाई भागातील भूमिगत मलनिसारण व्यवस्था मुख्य रस्त्याचे डांबरीकरण याबाबत सविस्तर आढावा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला. क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वरुढ पुतळयाचे काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचे तसेच शहरातील विविध विकास काम लवकरात लवकर पूर्णकरण्याचे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिले.
या आढावा बैठकीस आमदार संजय सिरसाट, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.नेमाने, रविद्रं निकम, शहर अभियंता सखाराम पानझडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा आदी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीस शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी औरंगाबाद शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या सातारा देवळाई भागात आणि शहरातील गुंठेवारी भागात भूमिगत मलनिसारण व्यवस्था तयार करण्यासाठी, शहरातील विविध मुख्य रस्त्याचे क्रांकीट तसेच डांबरीकरण करण्यासाठी, गरवारे स्टेडियमचा विकास करण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराज पुराण वस्तू संग्रहालयाचे नुतणीकरण आणि इतिहास संशोधन केंद्राची निर्मित्ती करण्यासाठी, स्वातंत्र्य वीर सावरकर संशोधन केंद्र व म्यूझियमच्या माध्यमातून जीवनपट निर्मित्ती करण्यासाठी, अतिवृष्टी झाल्यामुळे सोयीसुविधांची पुन:बांधणी करणे, नुकसानीच्या अनुषंगाने विकास कामांना शासन निधी मिळून देण्याची विनंती केली.