दै चालु वार्ता वृत्तसेवा /
मुंबई : भारतीने तिच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवल्याचा आनंद इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तिने एक मजेदार क्लिप पोस्ट केली आहे. टेलिव्हिजन आणि मनोरंजन क्षेत्रात काम केल्यानंतर, हर्ष आणि मला आमच्या निष्ठावंत प्रेक्षकांशी थेट संपर्क साधायचा होता, जे चाहते आम्हाला दररोज पाहण्यास उत्सुक असतात. पण, टीव्हीच्या बाबतीत असे काही वेळ बंधन आहे की, तुम्ही फक्त विशिष्ट वेळेवर शो दाखवू शकता. पण आता यूट्यूबद्वारे आमचे दर्शक आम्हाला कधीही आणि कुठेही पाहू शकतात. चॅनेलच्या आशयाबद्दल, तिने म्हटले आहे की, टीव्हीवरील अनेक निर्बंधांमुळे अनेक वेळा सामग्रीबद्दल काळजी घ्यावी लागते, परंतु आमच्या चॅनेलमध्ये दररोज मनोरंजनाची भर पडेल. आतापर्यंत टीव्हीवर आपल्या कॉमेडीने सर्वांना गुदगुल्या स्टार कॉमेडियन-अभिनेत्री भारती सिंह आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील तिच्या चाहत्यांची मने जिंकण्याची तयारी करत आहेत.भारतीने व तिचा पती हर्ष लिंबाचियासोबत एक यूट्यूब चॅनेल लाँच केले आहे. त्या चॅनल ला ङ्कभारती टीव्हीङ्क असे नाव देण्यात आले साल्याचे सांगितले जात आहे. तसेच भारतीचे हे नवीन चॅनेल अनेक कॉमेडी शो होस्ट करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगण्यात येत आहे. या वाहिनीवर अनेक दशकांपासून टीव्ही शोसारखे मनोरंजन देण्याची पूर्ण तयारी आहे. ज्यामध्ये ङ्कद ग्रेट इंडियन गेम शोङ्क नावाने पहिला शो यूट्यूबवर प्रसारित होईल.