
दै चालु वार्ता
प्रतिनिधी / वडेपुरी
मारोती कदम
अतिशय कर्तव्यदक्ष असे शैक्षणिक क्षेत्रातील गांधीनगर कलंबर येथील केंद्रीय मुख्याध्यापक पठाण सर यांच्या कर्तव्यदक्षता प्रामाणिकपणावर त्यांची शिक्षण विभागामध्ये सोनखेड बीट येथील शिक्षण विस्तार अधिकारी पदावर पदौन्नती झाली. त्याचे सर्वत्र जिल्हा परिषद शाळा, शैक्षणिक संस्था, खाजगी संस्था ,येथील सर्व कर्मचारी वृंद यामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे त्यांचे खूप मोठे शैक्षणिक योगदान असल्यामुळे सर्व स्तरातून त्यांची कौतुक करण्यात येते,पठाण सरांचा मनमिळाऊ स्वभाव,शिस्तप्रिय वागणे,वक्तशिरपणा,यांची पोचपावती म्हणायला काहि हरकत नाहीपरिसरातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी वृंद यांनी त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले पठाण सर राज्यपुरसकारप्राप्त शिक्षक आहेत अशा या अष्टपैलु व्यक्तिमत्वास भावी कार्यास खुप शुभेच्छा.