
दैनिक चालू वार्ता
परमेश्वर वाव्हळ, पिंपरी शहर प्रतिनिधी,
पुणे– दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पुण्याच्या उपमहापौरांनी एड्स ग्रस्त मुलांसोबत दिवाळी साजरी केली. कोरोनामुळे पालकांचे छत्र हरवलेल्या तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी यांच्या सोबत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुण्याच्या उपमहापौर मा. सौ. सुनीताताई परशुराम वाडेकर व रिपाइं नेते मा.परशुराम वाडेकर यांनी एड्स ग्रस्त मुलांसोबत दिवाळी साजरी करत खऱ्या माणुसकीचे दर्शन घडवले. या सोहळ्यास रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, रिपाईचे पुणे शहराध्यक्ष शैलेंद्रजी चव्हाण, भाजपा सरचिटणीस राजेश पांडेजी, पुणे जिल्हा युवक आघाडीचे उमेशची कांबळे, रिपाईचे शिवाजीनगर मतदार संघाचे अविनाश कदम, भाजपा सरचिटणीस शिवाजीनगर मतदार संघाचे आनंद छाजेड, रिपाई यु.आ.अध्यक्ष शिवाजीनगर मतदार संघाचे महादेव साळवे, यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अॅड. ज्ञानेश जावीर यांनी केले.दरम्यान या कार्यक्रमास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे