
दैनिक चालू वार्ता.
मिलिंद खरात.
पालघर जिल्हा प्रतिनिधी.
कास्ट्राईब शिक्षक संघटना ठाणे जिल्ह्याच्या वतीने कृष्णा इंगळे अध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी महासंघ यांचा 75 वा वाढदिवस आदिवासी महिलांना साडीचोळी वाटप व शालेय विद्यार्थ्यांना स्कुल बॅग,कोविड सुरक्षा साहित्य वाटप करून साजरा
महाराष्ट्र राज्यातील पाच लाख कर्मचाऱ्यांचे घटनात्मक सरळसेवा भरती अनुशेष ,पदोन्नती आरक्षण व विविध सेवाविषयक प्रलंबित प्रश्न मागील 50 वर्षांपासून सोडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे कर्मचारी वर्गाचे कंठमनी ,झुंजार कर्मचारी नेते कृष्णाजी इंगळे साहेबांचा 8 नोव्हेंबर 2021 अमृतमहोत्सवी वाढदिवस सामाजिक कृतज्ञता दिन म्हणून कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद शाळा डोहोळेपाडा तालुका भिवंडी येथील 200 आदिवासी भगिनींना साडीचोळी व 100 विध्यार्थ्यांना स्कुल बॅग तसेच आरोग्यविषयक कोविड सुरक्षा आरोग्य साहित्य किट चे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या दानशूर सदस्यांनी केलेल्या मदतीवर संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरूवात छत्रपती शिवाजीमहाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले,विश्वरत्न, महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन मान्यवरांचे हस्ते करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान रवींद्र पालवे राज्य कार्याध्यक्ष ,तर प्रमुख अतिथी सौ श्रेया गायकर सभापती महिला व बालकल्याण सभापती जिल्हा परिषद ठाणे ,वैशाली चंदे सदस्य जिल्हा परिषद ठाणे,हजर होत्या .सौ छाया हरड सरपंच डोहळे ,करुणा वारके उपसरपंच डोहळे,तुषार भालेराव कार्याध्यक्ष दिव्यांग विभाग ,वसंत धनगर अध्यक्ष सिद्धार्थ फौंडेशन,पत्रकार मिलिंद जाधव ,प्रभाकर जाधवकेंद्र प्रमुख , सिधोदन जाधव ग्रा. प. सदस्य , आर .डी. वनगा ग्रामसेवक डोहळे,विष्णू मोरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,अशोक म्हसकर माजी अध्यक्ष,
मुख्याध्यापक जगदीश जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ठाणे जिल्हा अध्यक्ष विजयकुमार जाधव ,कोकण अध्यक्ष संतोष गाढे ,कोकण उपाध्यक्ष अशोक गायकवाड, नवनाथ जाधव पालघर अध्यक्ष ,दिनेश शिंदेकार्याध्यक्ष कोकण ,मनोज गोंधळी ,शहापूर अध्यक्षआनंद सोनकांबळे अंबरनाथ अध्यक्ष,बापू ढोडरे कल्याण अध्यक्ष,संजय ओंकारेश्वर कल्याण मनपा अध्यक्ष,लक्ष्मण कांबळे कार्याध्यक्ष,
अरुण हिवरे कोषाध्यक्ष विनायक भालेराव केंद्रप्रमुख अध्यक्ष , अरविंद सोनवणे ,
राजेश रोकडे,अनिल वाढविंदे ,दामू धादवड, प्रफुल्ल गडकरी,सतिष भोसले,जगदीश जाधव ,शारदा वाहणे, दिलशाद शेख , काशीनाथ कांबळे यांनी विशेष मेहनत घेतली.
प्रास्ताविक विजयकुमार जाधव यांनी तर बहारदार सूत्रसंचालन कोकण उपाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी केले आभार प्रदर्शन जगदीश गायकवाड शहापूर सचिव यांनी केले.
आजच्या काळात हॉटेल रिसॉर्ट येथे भव्य दिव्य झगमगाटात वाढदिवस साजरा केला जातो अश्या वेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेने समाजोपयोगी उपक्रमातून साजऱ्या केलेल्या या वाढदिवस उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.