दैनिक चालू वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी :-राम चिंतलवाड
हिमायतनगर /- शहरासह तालुक्यात आज दिनांक 18 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस सुरू झाला तेव्हा सिबदरा येथील शेत शिवारात सोयाबीन काढणी साठी गेलेल्या तिन शेतकऱ्यावर वीज कोसळली त्यात वारगटाकळी येथील मयत शेतकरी सुनील साहेबराव वायकोळे वय 34 हा सोयाबीन काढणीसाठी सिबदरा येथे गेले असता अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पाऊसात शेतातील सोयाबीन वर फारी झाकण्यासाठी धावपळ करत असलेल्या तिन शेतकऱ्यावर अचानक वीज कोसळून त्यात एक जण जागीच मृत्यू झाला तर दुसरे दोघे गजानन टोकलवाड हा गंभीर जखमी झाला असल्याचे घटना स्थळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी सांगितल आहे.