
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी माकणी
गणेश विठ्ठलराव मुसांडे
लोहारा ते पाटोदा रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून या संदर्भात संभाजी ब्रिगेड कामगार आघाडीने यापूर्वी एक वेळेस आंदोलन केले होते माञ तात्पुरती डागडुजी करण्याचे आश्वासन देऊन पाऊस बंद झाल्यानंतर तात्काळ काम सुरू करण्याचं संभाजी ब्रिगेड कामगार आघाडीला लेखी आश्वासन देण्यात आलं होतं त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले माञ महिना उलटला तरी अद्याप पर्यंत तात्पुरत्या डागडुजी शिवाय कुठलेही काम करण्यात आलेला नाही रस्त्याची चाळणी झालेली असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रिस्त अवस्थेत दिसून येत आहे आठ दिवसात याकडे सर्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष द्यावे अन्यथा संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे का.आ. तालुकाध्यक्ष महेश गोरे कार्याध्यक्ष तानाजी पाटील शहराध्यक्ष प्रशांत थोरात शहर सचिव सुरज माळवदकर नानासाहेब गोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते