दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई | शिवसेना नेते सुषमा अंधारे यांनी शिंदें सोबत गेलेल्या आमदारांबाबत एक मोठा दावा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीये.
शिंदे सोबत गेलेले अनेक आमदार अस्वस्थ आहेत.
ते परत येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परत येतील की नाही माहीत नाही. पण ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहणार नाहीत हे निश्चित. चाळीस पैकी एकही आमदार निवडून येणार नाही असा दावा सुषमा अंधारे यांनी केला.
शिंदे गट आणि भाजप या दोघांत खूप असंतोष आहे. येणाऱ्या काळात या असंतोषाचा भडका उडेल, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांचा उपमर्द करण्याचं काम सध्या भाजप मध्ये सुरू आहे. त्यांचा माईक काढला जातो. त्यांना कागद पुरवली जातात. तोंडावर कागद ठेऊन त्यांना सूचना करतात. मुख्यमंत्री सक्षम नाहीत हे दाखवण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.