
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी-माधव गोटमवाड
कंधार येथील दै.उ.मराठवाडा या वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी मुरलीधर थोटे यांनी गेल्या काही महिन्यात निशब्द आस्वाचा पूर…ओसाळतो इथे’ यासह ‘हुतात्मा स्मारकाचे झाले वाळवंट’ या बातमीची दखल घेऊन मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांच्याकडून ‘राज्यस्तरीय कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार,प्रदान झाल्याबद्दल शैक्षणिक,सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मिळालेल्या पुरस्काराचे औचित्य साधून जन्मभूमी जांब नगरीत लंगोटीयार मित्र मुरलीधर थोटे यांचा निसर्गरम्य वातावरांत त्यांच्या मित्रांनी प्रेमाची उब म्हणून शाल,पुष्पहार घालून सन्मान करून मिठी मारत कानात गुणगुण करून मेरे यार म्हणत सर्व मित्रमंडळाच्यावतीने शुभेच्छा दिल्या.
अभिनंदन ! गेली काही दिवसापासून जवळपास सर्व पेपरला पुरस्कार मिळाल्याबद्दलच्या बातम्या आल्या तसे आम्ही मित्रपरिवाराने फोनवरून तुला ‘राज्यस्तरीय कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन हि केलं. हे ऐकून खूप आनंद झाला.शाब्बास! मुरली म्हणून संदेश हि पाठवला.
शैक्षणिक,सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा मिळालेला पुरस्कार तुझा नसून आम्हा सर्वांची मान उंच झाल्याची आठवण करीत याचा आम्हाला हि अपार आनंद असल्याच्या प्रतिक्रिया त्यांच्या मित्रांनी दिल्या. थोटे यांचा मित्र परिवार विविध क्षेत्रातील ऑफिसर,इंजिनियर,शिक्षक,छोट्या मोठ्या उद्योग धंद्यात आहेत. दीपावलीच्या निमित्ताने हि सर्व मित्र मंडळी आपल्या गावी आल्याने या सर्व मित्रमंडळींनी एकत्र येऊन त्यांचा सन्मान केला.
मित्राचा हा सत्कार संभारंभ जांब बु येथील जन्मभूमीत करण्यासाठी मुंबई येथे पी.आर.ओ म्हणून कार्यरत असणारे सैनिक पी.के.आनेवाड व जांब बु.चे प्रथम नागरिक प्रतिनिधी बाळासाहेब पुंडे सह श्रीकांत सूर्यवंशी,इंजि.शिवानंद कोंडामंगळे,प्रगतशील शेतकरी एकनाथ कुंभार,शिक्षक भगवान पुंडे,जीवन थोटे,सय्यद अजीमसह अनेक मित्र समूह उपस्थित होता.