
दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
सतत कर्तव्यात व्यस्त असणा-या पोलीस बांधवांसोबत पोलीस स्टेशन मध्ये जावूनच भाऊबीज साजरी करण्याचा अनोखा उपक्रम अंबाजोगाई तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने यावर्षी राबवण्यात आला. या उपक्रमाचे कौतुक होत आहे. सतत कामात व्यस्त असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सर्व सणांच्या काळात ही आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत आपले काम करावे लागते. दिवाळी सायख्या महत्त्वाच्या सणातही त्यांना आपल्या कुटुंबाला वेळ देता येत नाही. त्यातच भाऊ बहिणीचे पवित्र नाते जपणारा भाऊबीज हा सण पोलीस बांधवांना साजरा करता यावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा अंजली पाटील यांनी यांनी आपल्या महिला • कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये | भाऊबीजेच्या दिवशी जावून दिव्यांची रोशनाई करुन कर्तव्यावर व्यस्त असणा या पोलीस बांधवांना ओवाळून भाऊबीज साजरी केली. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने राबविण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी पोलिस निरिक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सर्व पोलीस कमचारी तालुका अध्यक्ष अंजली पाटील, शहर अध्यक्ष नंदिनी सानप युवती तालुका अध्यक्षा प्रियांका गीते, गणेश अवताडे व इतर महिला पदाधिकारी यवती पदाधिकारी व युवक पदाधिकारी यांची उपस्थित होती.