दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
कोरपना तालूका चनई
कोरपना तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत वर भारतीय जनता पार्टी ने एकहाती सत्ता काबीज केली असून अनेक सरपंच व सदस्य निवडून आले आहे,नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत धोनीला तांडा व चनई बु.ग्रामपंचायत वर भारतीय जनता पार्टी समर्पित उमेदवार विजयी झाले असून त्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला.
माजी आमदार अँड.संजय भाऊ धोटे यांच्या पुढाकारातून धानोली तांडा व चनई बु येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचा सत्कार राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय भाऊ धोटे यांच्या पुढाकारातून व त्यांच्या उपस्थिती सत्कार करण्यात आला माजी आमदार अँड संजय धोटे यांनी शाल व पुष्पहार देवुन सर्व सत्कारमूर्तीचा सत्कार केला व यावेळी बोलताना म्हणाले की, गावातील विकासासाठी आम्ही तुमच्या सोबत असून कोणतेही काम असल्यास पूर्ण सहकार्य करण्यात येईल असे ते बोलताना म्हणाले,यावेळी भाजपा नेते निलेश ताजने,भाजपा आदिवासी नेते व माजी सरपंच अरुण मडावी,भाजपा शहर अध्यक्ष अनिल कवरासे,माजी सरपंच विजय रणदिवे,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य ओम पवार,वामन खाडे संतोष माणूसमारे तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.