
दैनिक चालू वार्ता
म्हसावद सर्कल प्रतिनिधी
सुनिल पाटील.
खाजगी वाहने करताय दुप्पटीने भाडे वसुली
नंदूरबार ,शहादा, अक्कलकुवा, नवापूर आगारातील एस टी प्रवासी वाहतूक सेवा एस टी सेवा कमॅचार्याच्या आदोलनामुळे पूणॅपणे बंद आहे .
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा एस टी कमॅचार्यानी आपली प्रमुख मागणी एस टी महामंडळ हे महाराष्ट्र शासनात विलगीकरण करावे. या सोबतच एस टी कमॅचार्याना ही महाराष्ट्र राज्य शासनाचे कमॅचार्याना महाराष्ट्र राज्य शासनाचे कमॅचार्यानप्रमाणे सेवाजेष्ठता निश्चित करून एस टी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या सह विविध मागण्यांसाठी ता.7/11/2021चा मध्यरात्री पासून संप पुकारला आहे. त्या मुळे नंदूरबार, शहादा, अक्कलकुवा, नवापूर आगारातील एस टी सेवा कमॅचार्याच्या आंदोलनामुळे पूणॅ पणे बंद आहे. एस टी कमॅचार्यानी आपल्या विविध मागण्यांसाठी मध्यरात्री पासून बेमुदत संपाला सूरूवात केली आहे.पहाटेपासून शहादा, अक्कलकुवा, नवापूर या आगारा मधून एकही बस बाहेरगावी रवाना झालेले नाही. नवापूर ,शहादा, अक्कलकुवा बस आगारातून सूरू असलेल्या संपामुळे प्रवाशांना महात्रास सहण करावा लागतोय. जो पयॅत एस टी कमॅचार्याना मागण्या मान्य होत नाही तो पयॅत संप सूरू रहाणार असल्याचे आंदोलनाला बसलेल्या कमॅचार्यानी सांगितले आहे.
शहादा येथे आंदोलन महाराष्ट्रभरातून गेल्या चार महिन्यात 35पेक्षा अधिक एस टी कमॅचार्यानी आत्महत्या केली आहे.याचे कारण कमी वेतन तेही वेळेत मिळत नाही. तुटपुंज्या पगारावर परिवाराचा उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेतून एसटी कमॅचार्याना आत्महत्याचे सत्र सुरूच आहे .महाराष्ट्र शासनाने एस टी कमॅचार्याना राज्य शासकीय कमॅचार्यानप्रमाणे वेतन अदा करावे. शासकीय कमॅचार्यानमध्ये विलनीकरण करून न्याय द्यावा या प्रमुख मागणीसाठी नंदूरबार जिल्हातील शहादा आगारातील एस टी कमॅचार्यानी एकजूटीने काम बंद आंदोलन सूरू केले आहे अशा वेळी शहादा व तळोदा मतदार संघाचे भाजप चे कायॅकत्यॅ व आमदार साहेब श्री राजेश पाडवी व मनसेचे महाराष्ट्र राज्य नवनिमाॅन सेना नंदूरबार जिल्हाचे जिल्हा ध्यक्ष राजेश्वर सामून्द्रे यांचा जाहीर पाठींबा दिला आहे . कमॅचार्याना सातत्याने विलंबाने मिळणारे वेतन तसेच आथिॅक समस्यामुळे तीसहून आधिक कमॅचार्यानी केलेल्या आत्महत्या आणि महामंडळाच्या गैरकारभारामुळे कमॅचार्याना मनात अविश्वास निमाॅण झाला आहे. त्याचा भडका उडाल्याचे सांगत श्री. सामून्द्रे यांनी उपोषणकत्याॅना पाठिंबा दिला. या वेळी मनसेचे अमेय राजहंस ,दिपक खेडकर ,दिनेश नेरपगार , गोपाळ कोळी आदी कायॅकतॅ व एस टी कमॅचारी सोबत होते.
महाराष्ट्र शासनाने खाजगी वाहनधारकांना एस टी संपा मुळे प्रवासी वाहतूक मान्यता दिली तरी खाजगी वाहनधारकांनी एस टी चा भाडे पेश्रा तीन तर चार पटानी भांडे वसूल करून प्रवाशांची लूट सूरू केलीय पूणे मुंबई ,नाशिक या साठी 2500/3000पयॅत एक प्रवासी मागे भांडे द्यावे लागत आहे आशा पध्दतीने लूटमार चाललीय