
दै. चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
प्रति हेक्टरी शेतकरी वाटा – ९०० रूपये, प्रति हेक्टरीशासन वाटा – १२६०० रूपये, एकूण १३५०० प्रति हेक्टरी प्रिमियम कंपनीला गेला. प्रति हेक्टरी संरक्षित रक्कम ४५००० रूपये. नांदेड जिल्ह्यातून सोयाबीन पिक विम्यासाठी गेलेली रक्कम एकूण शेतकरी वाटा ४४ कोटी एकूण शासन वाटा ५९४ कोटी रुपये एकूण प्रिमियम ६३८ कोटी रुपये, एकूण संरक्षित रक्कम २३०० कोटी रुपये. आपल्याला आले किती २३०० कोटी संरक्षित रक्कमेपैकी शेतकर्यांना मिळाले फक्त ४६१ कोटी रुपये म्हणजे ६३८ -४६१ =१७७ कोटी रुपये निव्वळ नफा, जेवढे पैसे शेतकर्यांच्या नावावर भरले तेवढे पण परत आले नाही. एकट्या नांदेड जिल्ह्यात १७७ कोटी रुपये नफा शेतकऱ्यांना नाही तर पिक विमा कंपनीला आणि हो २५ % अग्रीम पण ४६१ कोटी मध्येच आले. तसेच पिक विमा कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्येक गावातील शेतकऱ्यांकडून ५०० रुपये कोंबड,दारू घेतले ते वेगळेच आहे. ज्यांनी पैसे, मटण, दारू दिले नाही, त्यांना पिक विमा कमी व ज्यांनी सर्व दिले त्यांना पिक विमा जास्त दिलेला आहे. हा कुठला न्याय आहे. पेठवडज सर्कल मधील शेतकरी विचारीत आहेत. ही काय अजब हीशोबाची गजब कहाणी म्हणत आहेत. तेंव्हा शेतकऱ्यासाठी शासनाने जास्त पिक विमा देण्यात यावा व दोषी अधिकारी व कर्मचारी यांना कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पेठवडज सर्कल मधील सर्व गावातील शेतकरी करीत आहेत, याची शासनाने नोंद घ्यावी लागेल. व शेतकर्यांना जास्त प्रमाणात पिक विमा द्यावे.