
दै. चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड,
दिवाळी सुट्या संपवून ११ नोव्हेंबर पासून दूसरे सत्र सुरू होत संजय गांधी हायस्कूल कलंबर ता.लोहा येथे राष्ट्रीय संपादणूक चाचणी परीक्षा १२ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. १२ नोव्हेंबर रोजी एनसीईआरटी मार्फत राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (एनएएस) द्वारा चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणी परीक्षेसाठी संजय गांधी हायस्कूल कलंबर ता. लोहा या शाळेची इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यासाठी परिक्षा केंद्र देण्यात आले आहे. नॅस सर्वेक्षणासाठी क्षेत्रीय अन्वेषक म्हणून पर्यवेक्षीय अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. निरीक्षक म्हणून सीबीएसई शाळेतील शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. चाचणीसाठी निवड झालेल्या शाळेतील नियोजीत वर्गातील 30 विध्यार्थ्याची चाचणी होणार आहे. या चाचणी आयोजनाबाबत प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड व शिक्षणाधिकारी जि.प. शिक्षण विभाग नांदेड यांच्यामार्फत संबधित यंत्रणेला प्रशिक्षण देण्यात आले आहे. चाचणी परिक्षा केंद्राला जिल्हा स्तरावरून नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राचार्य डायट, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी भेटी देणार आहेत. सदर चाचणी परिक्षा शांततेत सुरळीत पणे पार पाडावी तसेच निवड करण्यात आलेल्या वर्गातील १००% विद्यार्थी चाचणीच्या दिवशी शाळेत उपस्थीत राहतील यासाठी सर्वानी खबरदारी घ्यावी असे आवाहन गट शिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के साहेब यांनी केले आहे. तेंव्हा संजय गांधी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात परिक्षेसाठी उपस्थीत राहावे असे संस्थेचे अध्यक्ष श्री. मारोतीराव निवृत्तीराव घोरबांड पाटील यांनी सांगीतले आहे.