दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : गौतम गंभीरने पुन्हा एकदा कोहलीची खरपट्टी करत केले वादग्रस्थ वक्तव्य, म्हणाला खरा हिरो..
गौतम गंभीरने पुन्हा एकदा कोहलीची खरपट्टी करत केले वादग्रस्थ वक्तव्य, म्हणाला खरा हिरो..
टीम इंडियाने टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये आपली विजयी घोडदौड कायम ठेवत नेदरलँड्सचा ५६ धावांनी पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी धमाकेदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात कोहली आणि सूर्याचा फॉर्म पाहून सर्वजण आनंदी दिसत आहेत, तर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने पुन्हा एकदा विराट कोहलीची खरडपट्टी काढत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
वास्तविक, भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर अनेकदा आपल्या विचित्र विधानांमुळे चर्चेत असतो. नेदरलँड्सविरुद्ध भारतीय संघाच्या नुकत्याच झालेल्या विजयावरही गंभीरने वादग्रस्त विधान केले आहे. गौतमने स्टार खेळाडू विराट कोहलीबद्दल ही वादग्रस्त टिप्पणी केली आहे. २७ ऑक्टोबर रोजी नेदरलँड्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी भारतीय संघाच्या वतीने धमाकेदार खेळ करून सर्वांना प्रभावित केले.
मात्र भारताने सामना जिंकल्यानंतर गौतम गंभीरने विराट कोहलीला नाही तर सूर्यकुमारला खरा हिरो म्हटले. तो म्हणाला की खरा हिरो सूर्यकुमार यादव आहे, विराट कोहली नाही. तो म्हणतो की, जेव्हापासून सूर्या मधल्या फळीत फलंदाजीला गेला तेव्हापासून कोहलीवरचे दडपण दूर झाले आहे. “खरा हिरो सूर्यकुमार यादव आहे आणि विराट कोहली नाही कारण त्याने स्वतःवर दबाव घेतला आहे.
गौतम गंभीरने विराट कोहलीवर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही, विराट कोहलीने या विश्वचषकात दोन सामन्यांमध्ये सलग दोन अर्धशतके झळकावली आहेत. अशा स्थितीत त्याच्याविरोधात असे वक्तव्य चाहते कसे काय ऐकू शकतात.
टी-२० विश्वचषकात शानदार पदार्पण करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने सुपर-१२ च्या त्यांच्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सचा ५६ धावांनी पराभव केला आणि स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. या सामन्यात विराट कोहलीने दमदार अर्धशतक झळकावले आणि बॅक-टू-बॅक स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात अर्धशतक केले. त्याने ४४ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ६२ धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १४०.९ होता. त्याच वेळी, सूर्यकुमार यादवने देखील ५१ धावांची नाबाद खेळी खेळली, ज्या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट २०४ होता.