
दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
केज विधानसभा मतदारसंघात स्थानिक विकास निधीतून (आमदार फंड) विकास कार्यक्रमांतर्गत (सन २०२१-२२) स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबाजोगाई यास १ कोटी रुपयांच्या निधी अंतर्गत प्राप्त झालेल्या साहित्यांचा लोकार्पण सोहळा अनिकेत लोहिया मानवलोक संस्थेचे कार्यवाह, अंबाजोगाई व प्रसाद दादा चिक्षे ज्ञानप्रबोधिनी संचालक, अंबाजोगाई यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. स्थानिक विकास निधीतून रुग्णालयास १९ ऑक्सिजन केंद्रक, ३५ बिपॅप मशीन, १३ आयसीयू बेड, ०५ व्हेंटिलेटर देण्यात आले आहे.