
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी
बालाजी देशमुख
केज तालुक्यातील जवळबन येथे सेवा फाउंडेशन च्या वतीने गावातील सहशिक्षक हनुमंत करपे गुरुजी यांच्या नावाने अभ्यासिका सुरू करण्यात आली. या अभ्यासिकेच्या बांधकामाचे भूमिपूजन मंगळवारी मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, बाल कल्याण समिती सदस्य सुनील बळवंते, उपसरपंच प्रमोद करपे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच शिवाजी शिंपले हे होते. यावेळी बोलताना अनिकेत लोहिया म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची सोय हा स्तुत्य उपक्रम आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आणि पर्वणी आहे. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी मानवलोक कडून अभ्यासिकेत •साठी स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट देण्यात आली. कार्यक्र माच्या . यशस्वीतेसाठी आर. डी कुलकर्णी, शरद भाकरे सिद्धार्थ जोगदंड, धनंजय कुलकर्णी, आदींनी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्रताप भाकरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रसाद कुलकर्णी यांनी तर आभार दगडू पाटील यांनी मानले.