दै चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली : सध्या नीरज चोप्राच्या त्या ऐतिहासिक भाल्याचा ई-लिलाव केला जात आहे. ई-लिलावात या नीरज चोप्राच्या सुवर्णपदक विजेत्या भाल्यासाठी सर्वप्रथम १ कोटी रूपयांची बेस प्राइज ठेवण्यात आली होती. मात्र दुसऱ्या दिवशी बोलीनं ५ कोटी रूपयांचा टप्पा ओलांडला आहे. जपानमधील टोकयो ऑलिंपिकमध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोपरा सुवर्णपदक पटकावत इतिहास घडवला. या भारतीय क्रीडापटूनं ज्या भाल्यामुळे ऑलिंपिक सुवर्ण पदक मिळालं तो भाला आणि इतर क्रीडा साहित्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिलं होतं. त्याचा आता नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त ई लिलाव होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अशा अनेक मौल्यवान भेटवस्तूंचा ई-लिलाव सुरू करण्यात आला आहे. यात पुरस्कार विजेत्या खेळाडूंच्या क्रीडा साहित्यासह शिल्प, स्मृतीचिन्हं, महत्त्वाच्या इमारतींची मॉडेल्स, चित्रं आदींचा समावेश करण्यात आला आहे. या वस्तूंच्या लिलावातून मिळणारी रक्कम यनमामि गंगेय या प्रकल्पासाठी वापरली जाणार सांगण्यात येत आहे.
टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, ऑलिंपिक स्पर्धेत कांस्य पदक पटकवणारी महिला बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेनच्या ग्लोव्हजसाठी शुक्रवारी संध्याकाळपर्यंत ११ बोली लावण्यात आल्या. या ग्लोव्हजची मूळ किंमत ८० लाख रुपये अशी होती मात्र बोलीत सर्वाधिक किंमत १.९२ कोटी रुपयांवर पोहोचली. या लिलावात पॅरालिम्पिकमधील सुर्वणपदक विजेता भालाफेकपटू आणि जागतिक विक्रमवीर सुमित अँटिलच्या भाल्यासाठी १ कोटी ८ हजार रुपयांची बोली लागली.तसेंच
या भाल्याची मूळ किंमत १ कोटी रूपये होती. टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघ चौथ्या क्रमांकावर होता. मात्र संघाची कर्णधार राणी रामपालच्या हॉकी स्टिकसाठी या लिलावात उच्चतम बोली लावण्यात आली होती. तिच्या हॉकी स्टिकची मूळ किंमत ८० लाख रूपये असताना त्या तुलनेत बोली मात्र १,००,००,१०० रूपयांची होती. आणि आता क्रिकेटमध्ये
ङ्क या लिलावात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महात्मा गांधी यांच्या तिरंग्याची पार्श्वभूमी असलेल्या दोन पॅनेल्सवर साकारलेल्या अक्रेलिक पेटिंगचाही समावेश करण्यात आला होता. या पेटिंगची मूळ किंमत २५ लाख रूपये आहे. याशिवाय अनेक कलाकारांनी विविध प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून दिलेल्या अनेक चित्रांचा लिलाव केला जात असून, या कलाकृतींची मूळ किंमत ३ लाख रूपये ते २५ लाख रुपये अशी आहे. याशिवाय गेल्या दोन वर्षांत महत्त्वपूर्ण कार्यक्रमांमध्ये मान्यवर व्यक्तींकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या महत्त्वाच्या इमारती, शिल्पं, चित्रं आणि स्मृतीचिन्हांचाही या लिलावात समावेश करण्यात आला आहे.