
दै चालु वार्ता
प्रमोद खिरटकर
चंद्रपूर – प्रतिनिधी
चंद्रपूर : राज्यातील झालेली औद्योगिक क्रांती यामुळे निर्माण झालेले प्रदूषण पर्यावरण व विकासाचा प्रश्न यासाठी 2012 वित्तीय वर्षात महाराष्ट्र शासनाचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधीच्या आग्रह व मागणी योग्य असल्याने त्यावेळी औद्योगिक परिसरातील विकासासाठी रॉयल्टी शुल्कातून मूलभूत व पायाभूत गरजेच्या विकास कामासाठी परिसरातील ग्रामपंचायती नगरपंचायत नगरपरिषद या भागातील विकास कामासाठी खनिकर्म महामंडळाची स्थापना करून याकरिता निधी राखीव करण्यात आली कोरपणा या दुर्गम तालुक्यातील पहिल्यावहिल्या नामांकित माणिकगड सिमेंट कंपनी 1984 85 मध्ये अस्तित्वात आली ज्या गडचांदूर शहरालगत हा प्रकल्प उभा झाला त्या ठिकाणी अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याचबरोबर वन वैभव नष्ट करीत पर्यावरणाची ऱ्हास करून निसर्गरम्य कुसुंबी परिसरात चुनखडी उत्खनना करिता खदानी निर्माण करण्यात आल्या यामुळे या परिसरात वन्य प्राण्याचं घरटे नष्ट झाली पाण्याचा प्रश्न निर्माण झाला धूळ प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले या भागातील नागरिकांची नुकतीच एक सभा पार पडली. यामध्ये नागरिकांनी खनिज विकास निधीचा वापर माणिकगड सिमेंट व्यवस्थापन हे नागरिकाच्या कल्याणा ऐवजी स्वतःच्या शैक्षणिक संस्था वरच खर्च केल्याचा आरोप नागरिकांनी केल्या गेल्या आठ वर्षापासून मानोली, नोकरी, कुसुंबी, लींगणडोह, बॉम्बेझरी, पाटागुळा वरझडी, हिरापूर, आसापुर, बैलमपुर, जामणी इत्यादी गावात सामाजिक दायित्व निधी चा कोणता उपयोग झाला नाही अविरत या भागातून चुनखडी वाहनांची वाहतूक धुळीचे प्रदूषण यामुळे नागरिकांना समस्या जैसे थे आहे खनिज विकास निधी चे कामे ज्या गावांमध्ये शौचालय बांधकाम बेलमपुर, गोवारी गुळा या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले आहे त्यामुळे या निधीचा उपयोग झालाच नाही व स्वच्छ भारत अभियानाचा फजा उडाला निकृष्ठ शौचालय बांधकाम झाल्याने कोनी च वापर करत नसल्याचे विदारक चित्र गावात आहे शैक्षणिक व सामाजिक कार्यामध्ये मानीकगड या कंपनीचा योगदान नावापुरतेच आहे जवळच असलेल्या दुसऱ्या कंपनी महिला सक्षमीकरण शेती विषयक उपक्रम शैक्षणिक उपक्रम आरोग्य उपक्रम राबवून लोकांची मने जिंकत आहे मात्र नामांकित असलेल्या माणिकगड सिमेंट कंपनी च्या सामाजिक दायित्व निधी चा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असून समाजाच्या कल्याणासाठी काहीच उपक्रम ही कंपनी राबवित नाही आदिम कोलाम आदिवासी समाज लोक वस्ती या भागात जास्त असल्याने अज्ञानाचा फायदा घेऊन कंपनी निवड देखावा करीत आहे जवळच असलेल्या पाटा गुळा या ठिकाणी अनेक गरिबांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न विजेचा प्रश्न घराचा प्रश्न अनेक वर्षापासून रेंगाळला आहे आरोग्यविषयक व शैक्षणिक दृष्ट्या या कंपनीचा योगदान यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे गेल्या सहा सात वर्षात या भागात कोणताही विकास या कंपनीने केला नसून गडचांदूर सह परिसरातील सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत कंपनीच्या कामाची संपूर्ण चौकशी करून खनिज विकास निधी मध्ये व्यवस्थापनाकडुन झालेली दिरगांई व गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे यावेळी झालेल्या सभेमध्ये बापुराव आत्राम, केशव कुळमेथे, भावराव कन्नाके, दीपक कुळमेथे, सोमाजी आत्राम इत्यादींनी चौकशीची मागणी केली आहे.