दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पुणे- संभाजी गोसावी
डॅशिंग आयपीएस अधिकारी अंकित गोयल यांनी पुणे जिल्हा ग्रामीणचे मावळते पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव जी देशमुख यांच्याकडूंन रविवारी ता.३० रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारांस पदभार स्वीकारला. अंकित गोयल यांनी इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदवी घेवुन भारतीय पोलीस सेवेत १३ फेब्रुवारी २०२२ रोजी रोजी झाले होते. तरुण आणि डॅशिंग पोलीस अधिकारी अंकित गोयल यांच्याकडे अवघ्या आठ वर्षाच्या सेवेनंतर गडचिरोली सारख्या महत्त्वांच्या जिल्ह्यांची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यांत आली होती. अंकित गोयल यांनी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून २८ डिसेंबर २०२२ रोजी पदभार घेतला होता. वंचित घटकांना विकासांच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यांमध्ये विशेष प्रयत्न सुरू केले होते. ह्या काळात अंकित गोयंद यांनी नक्षलवाद्यांच्या चकमकीमध्ये २७ वर्षापासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या नक्षल नेता मिलिंद तेलतुंबडेसह ५४ नक्षलवादी मारले. दोन वर्षात ४४ जणांना अटक करण्यांत आली. त्यामुळे गडचिरोलीत सेवा देणाऱ्या ४२ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य पदक ३ जणांना शौर्य चक्र तर २ जणांना गुणवंतापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक ऑगस्ट २०२२ मध्ये जाहीर करण्यांत आले होते. एवढ्या संख्येने एका जिल्ह्यात एका वेळी शौर्य पदक जाहीर होणारा गडचिरोली हा पहिलाच माझा जिल्हा ठरला. या कामगिरीत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या कामगिरीचा मोठा वाटा होता. दरम्यान आगामी काही महिन्यांत पुणे महानगर पालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी अंकित गोयल यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे.