दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
नांदेड : – समाजसेवेचा वसा हाती घेतलेल्या आझाद ग्रुपने या वर्षीची दिपावली लोहा तालुक्यासह राज्यभरात विविध उपक्रमांनी साजरी केल्याने आझाद ग्रुपच्या सामाजिक उपक्रमाचे कार्य महाराष्ट्रात विविध जिल्ह्यासह तालुक्यातुन ऐकावयास मिळत आहे.
आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भिमाशंकर मामा कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली लोहा तालुक्याचे तालुकाध्यक्ष रुद्रा पाटील भोस्कर यांनी आपली दिपावली लोहा शहरातील बेघर व गोरगरीब व्यक्तीना मिठाई व लाडु वाटून साजरी केली असुन लोहा शहरात बालाजी मंदिर परीसरात पालात राहणाऱ्या गोरं गरीब व्यक्तीना दिपावली निमित्ताने मिठाई व लाडू वाटप करुन दिपावली साजरी केली यावेळी त तालुकाध्यक्ष रूद्रा पाटील भोस्कर महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिपकभाऊ रायफळे लोहा प्रसिध्दी प्रमुख विलास सावळे , वाहन चालक संघटनेचे तालुकाध्यक्ष नागेश पा लोंढे , संदिप पा कोरडे , विजय केंद्रे व आझाद ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यभरात सामाजिक शैक्षणिक कार्यात सतत सहभाग घेऊन गोरं गरीब सुशिक्षित बेरोजगार , खेड्यातील अन्य अडचणी शेतकरी बांधवाचे प्रश्न वेठीस धरून शासनाला व प्रशासना जागे करुन अन्याय अत्याचाराविरूद्ध आझाद ग्रुप झपाट्याने काम करत असल्याने राज्यभरातुन आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भिमाशंकर मामा कापसे व आझाद ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.