दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा : – लोहा तालुक्यातील सावरगाव नसरथ येथे सामाजिक कार्यात सतत सहभागी असणाऱ्या आझाद ग्रुपच्या कोषाध्यक्ष सौ ज्योतीताई भिमाशंकर कापसे यांचा विवाह सोहळ्या दरम्यान भव्य दिव्य सत्कार करण्यात आला.
सावरगाव नसरथ येथे सामाजिक कार्यकर्ते बालाजी भावे यांच्या यांच्या ताईच्या लग्नाला आझाद फाॅन्डेशनच्या कोषाध्यक्षा सौ ज्योतीताई भिमाशंकर कापसे यांनी स्वतः उपस्थित राहुन वधू वरांना विवाह सोहळ्याप्रसंगी शुभेच्छा दिल्या यावेळी भावे परीवारा तर्फे सौ ज्योतीताई भिमाशंकर कापसे यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी आझाद ग्रुपचे तालुकाध्यक्ष रूद्रा पा भोस्कर प्रसाद भाऊ पोले सहशिक्षक विठ्ठल पा कदम सर व आझाद ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.