
दै.चालू वार्ता,
जव्हार,प्रतिनिधी,
दिपक काकरा.
जव्हार:- जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत कासटवाडी हद्दीतील जव्हार-डहाणू या राज्य मार्गाला जोडणारा बाळकापरा-हाडे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.जवळपास पंधरा वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आलेला ह्या रस्त्याची आजपर्यंत कोणतीही देखभाल दुरुस्ती करण्यात आलेली नाही.त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तालुक्याला जोडणारा हा मुख्य रस्ता असल्याने याचा रस्त्याने शालेय विद्यार्थी,बस,चारचाकी तसेच दुचाकी वाहने प्रवासी व वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.जवळपास पाच कि.मी अंतर असणाऱ्या या रस्त्याची कित्तेक वर्षापासून दुरुस्ती न झाल्याने रस्त्याची साईडपट्टी खचून रस्ता खड्डेमय झाला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर रस्त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.या रस्त्या लगत आठ गाव व पाडे येत असून ४५० च्या आसपास लोकवस्ती असून हाच एकमेव मार्ग असल्याने नेहमीच या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ असते.
*बाळकापरा ते हाडे हा रस्ता खुपच खराब असून येथील नागरिकांना त्याचा मोठया प्रमाणात त्रास होत आहे.त्यामुळे शासनाने त्याची दखल घेवून लवकरात लवकर डांबरीकरण करावे*.