
दैनिक चालु वार्ता
चाकुर प्रतिनिधी
नवनाथ डिगोळे
मुख्याधिकारी न.प.दिले दहा दिवसांचे अल्टीमेट
चाकुर ता.प्रः-चाकुर शहरात जागोजागी रोड खराब झाले आहेत.बहुतांशी ठिकाणी शहरात रोड क्राॕसचे काम करण्यात आले नाहीत.लवकरात लवकर हे काम करावे अशी मागणी कॉग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
चाकूर नगरपंचायत हद्दीत असलेल्या चाकूर शहरातील सरणवाडी व माहुरवाडी येथील खराब झालेले रोड क्रॉस दुरुस्त करणे व आवश्यक ठिकाणी नवीन रोड क्रॉस करणे बाबत
चाकुर शहर काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात येते की, चाकुर नगर पंचायत हद्दीतील असलेल्या चाकूर शहरात, सरणवाडी व माहुरवाडी या ठिकाणी रस्त्यावर असलेले बरेच रोड क्रॉस नादुरुस्त झालेले आहेत. यामुळे रहदारीस फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे. याचा त्रास नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना सोसावा लागत आहे. या अगोदर याबाबत आपणास तोंडी सूचना बऱ्याच वेळा देण्यात आलेले आहे तरी पण अद्याप आपणाकडून या रोड क्रॉस दुरुस्तीचे कामाची सुरुवात झालेली नाही, हे दुरुस्तीचे काम लवकरच दहा दिवसाच्या आत सुरू करण्यात यावे, व तसेच ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी नव्याने रोड क्रॉस करण्यात यावे.अन्यथा जर आपण दहा दिवसाच्या आत वरील कामास सुरुवात केली नाही तर आपल्या विरुद्ध नगर पंचायत समोर चाकुर शहर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी निवेदनांवर शहर अध्यक्ष पप्पुभाई शेख,युवक जिल्हा सरचिटणीस भागवत फुले,सलीमभाई तांबोळी,गंगाधर केराळे, बाळु इरवाने, अनिल महालिंगे, शिवकुमार गादगे,विजय धनेश्वर,अविनाश गोलावार,सुनील शिंदे,अझहर सौदागर,आदि उपस्थित होते.