दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे.
देगलूर:देगलूर भुतनहिप्परगा येथे छत्रपती शिवाजीराजे महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले आरोग्य शिबिर युवा सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आले होते यावेळी डॉ. सुनील जाधव डॉ. संदीप वल्कले यांनी रुग्णांना ची तपासणी केली, नाना मोरे, सुमन क्लिनिक लॅब चे अप्पाराव पवार, विशाल ठाकूर शिवसेना तालुकाप्रमुख महेश पाटील, युवा उद्योजक सिद्धार्थ पांडवे शिवसेना देगलूर शहर प्रमुख बालाजी मैलागिरे, उपशहरप्रमुख संजय जोशी, गजानन कांबळे यासह भुतनहिप्परगा येथील वृद्ध स्त्री, पुरुष, युवा, प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होती यावेळी 200 रुग्णांनीची तपासणी करण्यात आली