
दै चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई : क्रिकेट संघांची कर्णधार मिताली राजच्या जीवनावरील सिनेमा लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार रुपेरी पडद्यावर बायोपिकचा ट्रेंड चांगलाच सुपरहिट ठरला आहे. एखाद्या व्यक्तीच्या जीवनावरील सिनेमा रसिकांना विशेष भावला आहे. मेरी कोम, मिल्खा सिंग, महेंद्रसिंह धोनी, संजय दत्त, सनी लिओनी असे एक ना अनेक व्यक्तींच्या जीवनावरील बायोपिक रसिकांची दाद मिळवून गेले आहेत.या बायोपिक सिनेमातून त्या त्या व्यक्तीचा जीवन संघर्ष रसिकांनी रुपेरी पडद्यावर पाहिला.या बायोपिक सिनेमांना रसिकांनी डोक्यावर घेतलं. आता आणखी एक बहुप्रतिक्षित बायोपिक रसिकांच्या भेटीला येत आहे.
‘शाब्बास मिथू’ असे या सिनेमाचे नाव असणार आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिखही समोर आली आहे. हा बायोपिक 5 फेब्रुवारी 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच सिनेमाचं पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे. सिनेमात तापसी पन्नू मितालीची भूमिकेत झळकणार आहे. बायोपिक सिनेमातील भूमिका खूप आव्हानात्मक असतात.कारण एखादा स्पोर्ट्सपर्सन बालपणापासून त्यावर मेहनत घेत असतो. अनेक वर्षे मेहनत घेतल्यानंतर तो त्या खेळात प्राविण्य मिळवतो किंवा यश संपादन करतो. या सगळ्या गोष्टी रुपेरी पडद्यावर दाखवता याव्या यासाठी तापसी स्वतःला तयार करण्यासाठी मेहनत घेत आहे. तापसीने ‘दोबारा’ सिनेमाचं शूट पूर्ण केल्यानंतर लगेचच या सिनेमाच्या तयारीला लागली होती. क्रिकेटची प्रॅक्टिस करताना तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. समोर आलेल्या फोटोमध्ये ती पूर्ण क्रिकेट किटसोबत प्रॅक्टिस करताना दिसली होती. तापसीने विविध भूमिका साकारत इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केेल आहे. याआधीच्या भूमिकांनाही रसिकांनी पसंती दिली होती. ‘ थप्पड’, ‘बदला’, ‘पिंक’, ‘ सांड की आंख’,’नाम शबाना’ अश्या अनेक धमाकेदार सिनेमातून तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. आता ‘शाब्बास मिथू’ या सिनेमातूनही ती स्वःला सिद्ध करणार असंच दिसतंय.