
दैनिक चालु वार्ता
फुलवळ प्रतिनिधी
नरशिंग पेठकर
फुलवळ: बहादरपुरा(ता कंधार)येथील समृद्धी मनोहर पेठकर या विद्यार्थिनीने 2021 मध्ये घेण्यात आलेल्या NEET परीक्षेमध्ये 720 पैकी 685 गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. त्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत बहादरपुरा यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत बहादरपुरा येथील सरपंच सौ.गोदावरीबाई गायकवाड,उपसरपंच हनुमंत पाटील पेठकर, ग्रामपंचायत सदस्य अवधूत पाटील पेठकर,भीमराव कदम, परमेश्वर पाटील पेठकर, बाबुराव पांचाळ यांची उपस्थिती होती.