दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड- गोविंद पवार
नांदेड : – विदेशातील डॉक्टर आपल्या भागात येऊन रुग्णांवर उपचार करतात त्यामुळे आपणास रुग्ण बरा होणारच असा आत्मविश्वास वाटतो. भारतातील डॉ लोह्याचे भुमिपुञ दिनेश चव्हाण यांनी दुबईत म्हणजे विदेशात जाऊन रुग्णांवर उपचार करतात हे आपल्या साठी अभिमानाची बाब होय.
माजी सभापती कै व्यंकटराव मुकदम यांचे नातू लोह्याचे भूमिपुत्र डॉ दिनेश माणिकराव मुकदम चव्हाण यांनी दुबई जाऊन रुग्णांवर दंत शस्त्रक्रिया केली दंत शल्य चिकित्सक डॉ दिनेश माणिकराव चव्हाण (मुकदम ) यांनी जर्मनी मध्ये जाऊन दंत विषयक आधुनिक अभ्यास केला आहे. दाताचे प्रत्यारोपण अतिशय सुलभतेने ते करतात.
दुबई येथील प्राईम मेडिकल हेल्थ सेंटर येथे कन्सल्टंट इमप्लॅनटॉलॉजिस्ट साठी ते गेले त्यांनी डिजिटल आणि रोबोटिक्स इमप्लॅन्ट सर्जरी यशस्वी पणे पार पडली यासाठी भारतातून खूप कमी सर्जन या साठी बोलवण्यात येतात त्यात डॉ दिनेश चव्हाण यांना बोलावले व हि दंत शस्त्रक्रिया डॉ दिनेश चव्हाण यांनी यशस्वीपणे केल्याने विदेशात जाऊन असा प्रकारची शस्त्रक्रिया आपल्या भूमिपुत्रांनी केली त्याबद्दल डॉ दिनेश चव्हाण यांचे लोहा शहरात नव्हे तर जिल्हाभरात कौतुक केले जात आहे.