दैनिक चालू वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
मुखेड:-मुखेड सा.वा हंगरगा प.क ग्रामपंचायतचे सरपंच व गावातील राजकीय हेवादाव्यामुळे तेथील कार्यरत असलेल्या ग्रामसेवकास गेल्या कित्येक वर्षांपासून नाहक त्रास होत आहे त्यामुळे मुखेड तालुका ग्रामसेवक संघटनेनी या ग्रामपंचायत कार्यालयावर बहिष्कार टाकला आहे .
मुखेड तालुक्यातील हंगरगा प.क ग्रामपंचायतीवर गेल्या दहा वर्षापासून एकाच कुटुंबाची एक हाती सत्ता आहे कार्यरत सरपंचाने गेल्या कित्येक वर्षापासून मनमानी कारभार चालवल्यामुळे व गैरव्यवहार मुळे सध्या चर्चेत आहे सदरील गावातील काही राजकीय मंडळी गैरव्यवहाराबद्दल आवाज उठवला आहे दोन ते तीन वेळेस पंचायत समिती कार्यालयावर मोर्चे करण्यात आले सरपंचाच्या गैरव्यवहाराची चौकशी सुरू आहे दरम्यान राजकीय हेवादाव्यामुळे तेथील जनता व ग्रामसेवक वैतागले आहेत सरपंचाच्या मनमानी व एक हाती कारभारामुळे कित्येक वर्षापासून कार्यरत ग्रामसेवकांना नाहक त्रास व मानसिक त्रास होत आहे त्यामुळे मुखेड तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष कृष्णा रामदीनवार यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा उपाध्यक्ष सय्यद नजीर, नागेश्वर, सचिव सतीश गायकवाड, संजय पाटील जाधव होनवडजकर,सचिन पाटील कुंदराळकर, बी.पी .मंदेवाड,बी.डी.पाटील, प्रवीण बारमाळे, अंतेश्वर इंगळे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन हंगरगा प.क ग्रामपंचायत कार्यालयावर ग्रामसेवक संघटनेनी बहिष्कार टाकत असल्याचे पत्र गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे या बैठकीस वसंत कल्याणकर, गजानन मामीलवाड, निळकंठ गीते यांच्यासह अनेक ग्रामसेवक यांची उपस्थिती होती.