
मुंबई :राजकुमार राव आणि पत्रलेखा 2010 पासून डेटिंग करत आहेत, असं कळतं. ते काही काळापासून एकत्र राहत आहेत. या दरम्यानच दोघांनी लग्नाचा निर्णय घेतल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. ह्यूमंस ऑफ बॉम्बे सोबत बोलताना पत्रलेखा म्हणाली होती की, तिनं राजकुमार रावला लव्ह सेक्स और धोखा या चित्रपटात पाहिलं होतं. हा चित्रपट 2010 मध्ये रिलिज झाला होता. त्यावेळी राजकुमार राव प्रत्यक्ष जीवनातही विचित्र असेल असं वाटलं होतं, पण नंतर हे मत बदलल्याचं तिनं म्हटलं. राजकुमार रावने पत्रलेखा हिला एका जाहिरातीत पाहिलं होतं. तेव्हा पासून तो प्रेमात होता, असं सांगितलं जातं. त्यांच्यातील मैत्री हळूहळू वाढत गेली. राजकुमार आणि पत्रलेखा यांनी हंसल मेहता यांच्या सिटीलाइट्समध्ये एकत्र काम केलं होतं. बॉलीवूडमधील लव्हबर्ड्स राजकुमार राव आणि पत्रलेखा आता नव्या बंधनात अडकणार आहेत. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला असून 10 नोव्हेंबर म्हणजेच आजपासून पवित्र विधिंना सुरुवात होणार आहे.यानिमित्त दोन ते तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचं कळतं आहे.
आजतकने ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार ही जोडी चंदीगड येथे दाखल झाली असून पारंपारिक पद्धतीने हा लग्न सोहळा पार पडणार आहे. याआधी अशी माहिती आली होती की, हे दोघे जयपूर येथे लग्न करणार आहेत. मात्र आता ही नविन माहिती समोर आली आहे. लग्न समारंभासाठी निवडक व्यक्तींनाच आमंत्रित करण्यात आल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. फिल्मी दुनियातील काही कलाकारांना आमंत्रण मिळाल्याची चर्चा आहे. दरम्यान या दोघांनीही अद्याप अधिकृत कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.