दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
अशी आहे ती अशी आहे ती
अशी आहे ती अशी आहे ती
जिची मी(अहं) बरोबर
कायम गट्टी
इतरांबरोबर नेहमीच कट्टी
अशी आहे ती
तिच्यात आहे अॅटिट्युड
भारी
आपल्या आपल्यांशी मैत्री जारी
फोनवर फक्त आपलेच
नातलग आपलेच मित्र
इतरांबरोबर कधीच नाही
भाषा सत्र
अशी आहे ती
तिच्यात आहे प्रामाणिकपणा टॅलन्ट भारी
मी मुळे सारते इतरांना दुरी
अशी आहे ती
तिला वाटते स्वर्ग दोन बोटे
पण मी मुळे आहे ते सर्व
खोटे
अशी आहे ती
मी ला ती कधी सोडणार नाही
ती ला मी कधी सोडणार
नाही
अशी आहे ती
मी ला सोडले तर आनंदी
आनंद भारी
स्वर्ग सुख लाभेल तिच्या
संसारी
पण मी चे घट्ट नाते तोडले नाही जरी
एकलकोंडी अंतर्मुख राहील बिचारी
कवयत्री :- नीता गोडबोले
(दि गुड पिपल्स फौंडेशन, आरोग्य समिती अध्यक्षा पुणे )