दैनिक चालू वार्ता मुखेड तालुका प्रतिनीधी- सुरेश जमदाडे
(नांदेड) – दीपावली सनाचा आनंद अनाथ बालकांपर्यत पोहचावा, या विचारातून भाजपा युवा मोर्चा महानगर उपाध्यक्ष अभिषेक (मोनू) जोशी यांच्या वतीने धनगरवाडी येथील लहुजी साळवे अनाथ विद्यालय येथे फराळ व मिठाई वाटप करण्यात आली.
सामाजिक बांधीलकी जोपासत, भाजपा युवा मोर्चा महानगर उपाध्यक्ष अभिषेक (मोनू) जोशी यांनी पुढाकार घेवून गुरुवार (ता.२७) रोजी धनगरवाडी येथील, लहुजी साळवे अनाथ विद्यालय येथे फराळ व मिठाईचे वाटप केले. भाजपा युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे यांच्या हस्ते फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी महानगर उपाध्यक्ष निलेश दादा देशमुख, राजूभाऊ (रॉक) निखाते, नागेश भाऊ मोरे, आकाश भाऊ गजभारे, राजू पाटील सूर्यवंशी, सोनू जोशी, किरण हाटकर, चंद्रकांत क्षीरसागर, योगेश पांचाळ, अमोल पांचाळ, आदीजन उपस्थित होते.