दैनिक चालू वार्ता मुखेड तालुका प्रतिनीधी- सुरेश जमदाडे
मुखेड सा.वा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या उपनेत्या सुषमा ताई अंधारे यांचे जांब येथे मुखेड तालुका शिवसेनेच्या वतीने नांदेडला नियोजित कार्यक्रमाला जात असताना भव्य स्वागत करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे ,शिवसेना उपजिल्हाप्रमुख भालचंद्र नाईक ,सरपंच बापुराव कांबळे,युवासेनेचे राहुल लोहबंदे,,शिवाजी गेडेवाड,शिवसेना शहरप्रमुख शंकर चिंतमवाड, उपतालुकाप्रमुख शंकर पिटलेवाड,शामसुंदर शिंदे जांबकर,युवासेनेचे योगेश पाटील भगनुरकर,माधव देवकत्ते,उमेश भाऊ सिद्धेश्वरे सावरगावकर,विभागप्रमुख संजय पाटील लादगेकर,योगेश मामीलवाड,योगेश पारसेवार,चिंटु कांबळे,ज्ञानेश्वर भाऊ देवकत्ते सावरगावकर,,योगेश मरकंटवाड,योगेश कामघंटे यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी शिवसेनेच्या वतीने जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे, उपजिल्हाप्रमुख भालचंद्र नाईक, योगेश पारसेवार यांनी उपनेत्या सुषमा ताई अंधारे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सुषमा ताई अंधारे यांनी जांब येथील सत्कार स्विकारुन मुखेड कंधार विधान सभा मतदार संघातील दिग्रस, कुरुळा सह अनेक गावातील येथील शिवसैनिकांनी त्यांचा सत्कार केला.