
दैनिक चालू वाताॅ
म्हसावद सकॅल प्रतिनिधी
सुनिल पाटील.
12गोवांशांची सुटका;मालेगावच्या चौघाना अटक.
शहादा:मालेगाव येथे कत्तलीसाठी मध्यप्रदेशातून एका पिक अप वाहनात अमानूषपणे कोंबून गूराची अवैधरित्या वाहतूक करणार्या वाहनासह 11लाख 13हजार रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात शहादा पोलिसांच्या सतकॅतेने कत्तलीसाठी जाणार्या 12गोवंशाची सुटका करण्यात आली. या प्रकरणी मालेगावच्या चौघा .संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील खेतिया येथून गूराची अवैध वाहतूक करणारा पिक अप क्रमांक (एम एच 04 डी एस 2461) महाराष्ट्रातील मालेगाव येथे जात असल्याची गुप्त माहीती पोलिस निरीक्षक राहूल पवार यांना मिळाल्यावर त्यांनी शहादा तालुक्यातील दराफाटा येथे पहाटे साडेपाच वाजता सापळा लावून संबधित वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्याने वेग वाढवित पळण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला अडवित त्याची तपासणी केल्यावर त्यात अमानूषपणे गूरे कोंबलेली आढळून आली. चालकासह साथीदारांची चौकशी केली असता ही गूरे मध्ये प्रदेश येथील खेतिया येथून मालेगाव येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली. यात चालक शेख नफीस शेख हनीप ,अखलाक अहमद मोहम्मद, साजीतखान शहीतखान ,शेख सादीक शेख मूशा (सवॅ रा.मालेगाव जि. नाशिक )यांना 11लाख 13हजार रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन 12जीवंत गूरांची सुटका करण्यात आली आहे . शहादा पोलिसात गुरांची तस्करी करणार्यावर पोलिस शिपाई अनमोल राठोड यांच्या फियाॅदीवरून महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976कलम 5(अ) चे उल्लंघन 9(अ)8,2,3,4,6महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सूधारणा) अधिनियम 1995 प्राण्याचा छड प्रतिबंधक अधिनियम 1960चे कलम 11(1)तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम 119मो.वा.का.क183/177प्रमाणे, मोटार वाहन अधिनियम 1954प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक तारासिग वळवी करीत आहे. सदर कारवाई पोलिस निरीक्षक राहूल पवार यांच्या पथकाने काल पहाटे साडेपाच वाजता केल्याने याबाबत पशुप्रेमी समाधान व्यक्त केले आहे .मध्येप्रदेशाकडून मोठ्या प्रमाणात अवैध गूरांची तस्करी होत असून यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी पशुप्रेमीनी केली आहे