दैनिक चालू वार्ता लोहा प्रतिनिधी- राम कराळे
लोहा तालुक्यातील. आंतेश्वर येथील शेतकरी दोमोधर सदाशिव कराळे यांचा बैल लंपिस्किन आजारामुळे दगावला असुन ऐकिकडे शेतकऱ्यावर ओला दुष्काळाचे संकट आहे आणि एकीकडे लंबी स्कीनच्या आजारामुळे त्रस्त झालेले शेतकरी अडचणीत सापडला आहे सध्या रब्बी हंगाम चालू असून शेतकऱ्यांचे हरभरा करडी गहू पेरणी साठी मशागतीचे काम चालू आहेत व मशागतीच्या कामाच्या वेळेस लंबी स्कीनच्या आजारामुळे शेतकऱ्यांचा बैल दगावल्यामुळे शेतकऱ्याच्या पुढे संकट उभे राहिले आहे