
दैनिक चालू वार्ता हातकणंगले प्रतिनिधी -कवि सरकार इंगळी
दुसऱ्या अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनात लाॅकडाऊन, ऊसकोंडी, पाणीफेरा… या सकारात्मक संदेश देणाऱ्या ग्रामीण कादंबरी लेखनाबद्दल प्रसिद्ध साहित्यिक डॉ. श्रीकांत पाटील यांची ज्येष्ठ साहित्यिक श्री. चंद्रकांत निकाडे व कवी श्री. मनोहर भोसले यांनी प्रकट मुलाखत घेतली. ग्रामीण भागातील शेतकरी, पूरग्रस्त नागरिकांचे विविध प्रश्न या कादंबरीतून लेखकाने मांडलेले आहेत. मुलाखत घेणाऱ्या मुलाखतकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची योग्य आणि अचूक उत्तरे लेखकांनी दिली आहेत. लेखक श्रीकांत पाटील आणि शिक्षक श्रीकांत पाटील यांची सांगड कशी घालता? शेतकरी जीवनातील प्रश्न मांडताना ते सकारात्मक का मांडले? तसेच व्यवस्थेविरुद्ध आसूड उगारण्याऐवजी शोषिक शेतकरीच तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला असेही विचारण्यात आले.
अशा विविध प्रश्नांची उत्तरे देताना लेखक डॉ. श्रीकांत पाटील म्हणाले, “या कादंबरीतील नायक हे दुसऱ्यांचे जीवन घडवितात. ते स्वतःच्या हातात दोरी घेऊन गळफास घेत नाहीत. ते संघर्ष करतात आणि जीवनाकडे सकारात्मकतेने पाहतात. जीवनात हार मानत नाहीत. तर परिस्थितीशी दोन हात करतात.हेच तर ऊसकोंडी या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. कादंबरी लेखनाबाबतची सडेतोड भूमिका
डॉ श्रीकांत पाटील यांनी मांडली
या कार्यक्रमात मराठी विषय समितीचे सदस्य डी.एल. नागावकर, कॅप्टन गणपतराव घोडके, मा प्रकाश तळवडेकर, गोवा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. सुरेश कुराडे, डॉ. सतीश तराळ, प्राचार्य एन. आर. भोसले , मा .फरजाना डांगे, प्रा. संभाजी पाटील, प्रा. आप्पासाहेब खोत , डॉ.शिवचरण उज्जैनकर, प्रकाश पाटील, परशराम आंबी, रवींद्र आपटे, रवींद्र महापुरे, अशोक कोकाटे, बाबा कदम , अजयकुमार वंगे रवींद्र आपटे ,अशोक कोकाटे, नसीम जमादार, प्रणिता तेली, उर्मिला तेली, शंकर अनासुने, डॉ मंदा नांदुरकर,अशी साहित्यिक मंडळी उपस्थित होती.
प्रसाद जाधव यांनी स्वागत केले. महेंद्र कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. नसीम जमादार व संयोगीता महाजन यांनी सूत्रसंचालन केले.
सदर साहित्य संमेलनात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतील साहित्यिक उपस्थित होते.