
दैनिक चालु वार्ता,शिरपूर
प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान धुळ्यातील दोन कर्मचाऱ्यांचे शासनामार्फत निलंबन करण्यात आले.याच्या विरोधात एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत निषेध व्यक्त केला. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना ४५ आगारातील ३७६ कर्मचाऱ्यांचे राज्यभरामध्ये निलंबन राज्य शासनातर्फे करण्यात आले आहे. त्यामध्ये धुळ्यातील दोन कर्मचाऱ्यांचे देखील या निलंबनामध्ये समावेश आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत असल्याचा आरोप लावत एसटी कर्मचाऱ्यांच राज्य शासनाने केलेल निलंबन तात्काळ मागे घ्यावे; या मागणीसाठी धुळ्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी निलंबन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याचं म्हणत राज्य सरकारच्या दडपशाही धोरणाचा निषेध केला आहे.धुळे मध्यवर्ती बसस्थानक आवारात राज्य शासनाच्या या दडपशाही धोरणाविरोधामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करीत आपला तीव्र संताप व्यक्त केला. तसेच राज्य सरकारचा निषेध केला आहे.