दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी जालना-आकाश माने
दि.3 नोव्हेंबर गुरुवार आज रोजी वाई ता. मंठा येथील तरुण तडफदार सेवेकरी भक्त मडळांनी श्री क्षेत्र नांगरतास संन्याश आश्रमा मध्ये येऊन 19 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर तीन दिवशी होणाऱ्या सद्गुरूच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आज सेवा केली. वाई या गावातील तरुण सेवेकर्यांनी आज दिवसभर गवत, काडी, कचरा इत्यादी आश्रमाचा परिसर स्वच्छ केला. व काही क्षण गुरुवर्य परमश्रद्धेय श्री महंत मोठे बाबाजी व महंत बालकगिरी बाबाजी यांचे सानिध्य लाभले व अशीच सेवा घडत राहो म्हणून बाबाजी कडून या सेवेकर्यांनी आशीर्वाद घेतला.