दै चालु वार्ता वृत्तसेवा
नांदेड : गृहमंत्री अमित शहा यांनी बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना २०१८-१९ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार झालेले प्रताप पाटील चिखलीकरांच्या घरी थेट भेट देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आता त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथील केंद्रीय राखीव पोलीस बल कॅम्प येथे वृक्ष लागवड व सैनिक संमेलनासाठी आले होते. गृहमंत्री अमित शहा यांच्या या दौऱ्याचा एकंदरीत विचार केला तर मात्र या दौऱ्यानंतर खासदार प्रताप पाटील चिखलीकर जोरदार चर्चेत आले आहेत. कारण केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आपल्या दौऱ्यातर प्रताप पाटील चिखलीकर यांच्या घरी अनपेक्षित भेट दिली आहे.
गृहमंत्र्यांची चिखलीकर यांच्या अनपेक्षित गृहभेटीने राजकारण्यांच्या मात्र भुवया उंचावल्या आहेत. परंतु गृहमंत्र्याच्या या गृह भेटीने प्रताप पाटील चिखलीकरांचे संसदेतील राजकीय वजन वाढून केंद्रीय मंत्री पदाच्या अशा पल्लवीत झाल्या असल्याची चर्चा आहे.
राज्याच्या तुलनेत नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर या जिल्ह्यातून कोणत्याही भाजपा नेत्यास केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळाले नाही. मात्र या गृहभेट व चहा पानाने चिखलीकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाबाबतच्या आशा पल्लवित झाल्या असल्याचा दिसत आहे. खासदारांच्या घरी जात केंद्रीय गृहमंत्री यांनी चिखलीकर परिवारातील चिमुकल्यांशी भेटत फोटो देखील काढले. या भेटीने नांदेडसह मराठवाड्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. गृहमंत्री अमित शाह हे नांदेड दौऱ्यावर ती होते. ते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून देशातील १७० रेजिमेंटमध्ये एक कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानुसार एक कोटीवा पिंपळ वृक्ष गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते कॅम्प मुदखेड येथे लावण्यात आला. त्यानंतर सैनिक संमेलनास गृहमंत्री अमित शहा यांनी संबोधित केले. या नियोजित कार्यक्रमानंतर अमित शाह यांनी जगप्रसिद्ध पवित्र शीख धर्मस्थळ गुरू गोविंद सिंगजी गुरुद्वारा पायरीचे दर्शन घेऊन भेट दिली.