अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालून अधिकृत बांधकाम करणाऱ्यांना अनधिकृत दाखवण्याचा सुरु झाला कारभार…
दैनिक चालू वार्ता
निलंगा प्रतीनीधी
राहुल रोडे
औराद शहाजानी येथील ग्रामपंचायत असून अडचण नसून खोळंबा या म्हणीप्रमाणे सध्या नावाजलेली दिसून येत आहे या गावात अनेक बोगस लेआऊट आधारे करुन नमुना नंबर ८ तयार करुन विक्री करणाऱ्या लोकांना पाठीशी घालण्याचे प्रकार झाल्याचे समोर असतानाची घटना ताजी असतानाच आता बोगस बनवलेल्या जागेवर केलेली बांधकामे अधिकृत दखविण्यासाठी शासनाच्या आदेशाला केराची टोपली टाखवित चुकीचे बांधकाम परवाने देण्याचा सपाटा सुरु केल्याचे दिसून येत आहे.
याची सविस्तर माहीती अशी की, २०१७ पासुन बांधकाम परवाना देण्याचे अधिकार हे ग्रामपंचायत चे बंद करुन तालुका पातळीवर उपविभागीय अधिकारी यांना रीतसर नगर रचनाकार कार्यालयाकडून मंजुर नकाशा व मुळ ७/१२ उतारा नोंद असणे गरजेचं आहे आणी ज्या जागेची रीतसर अधिकृत नोंदी आसल्याचे कागदोपत्री सिद्ध होत असेल अश्या बांधकाम धारकांना बांधकाम परवाना हा उपविभागीय अधिकारी यांना देण्यासाठी शासन आदेश आसल्यामुळे येथील जवळपास दहा जागा मालकांनी उपविभागीय कार्यालयाकडे बांधकाम परवाना मागणी केली होती पण फक्त एकाच व्यक्तीला योग्य कागदपत्रे असल्यामुळे मागच्या कांही महिन्यापूर्वी उपविभागीय कार्यालयाकडुन माहीती मिळाली.
आता महाविकास आघाडी सरकार च्या शासन निर्णयामुळे ग्रामपंचायतींना १५० ते ३०० चौरस मिटर चे बांधकाम करण्यासाठी बांधकाम परवानगीची गरज नाही आणी त्यापुढील बांधकाम करणाऱ्या लोकांना पुर्वीप्रमाणे रीतसर नगर रचनाकार कार्यालयाकडून मंजुर नकाशा व मुळ ७/१२ उतारा नोंद असणे गरजेचं आहे आणी ज्या जागेची रीतसर अधिकृत नोंदी आसल्याचे कागदोपत्री सिद्ध होत असेल अश्या बांधकाम धारकांना बांधकाम परवाना ग्रामपंचायत पातळीवर देण्यासाठी आदेश झाले तर येथील ग्रामपंचायत ही डोहाळे लागल्याप्रमाणे वागत ज्या अनधिकृत बांधकामाला उपविभागीय अधिकारी कार्यालयाने बांधकाम परवाना दिला नाही अश्या बांधकामांना ग्रामपंचायत ने बांधकाम परवाना अगोदर दिला व नंतर तो बांधकाम परवाना देण्यासाठी दोन महिन्यानंतर ठराव घेऊन मान्यता दिल्याचे दर्शविण्याचे नाटक दाखवित आहेत.
ज्या बांधकामांची अनधिकृत होत असल्याची तक्रार गावातील लोकांनी केल्या व ज्या बांधकामांच्या तक्रार न्यायालयात दाखल न्यायप्रविष्ट आहेत आहेत आश्या चुकीच्या बांधकामांना ग्रामपंचायतीच्या महाभाग राजकीय लोकांनी शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवित बांधकाम परवाने दिले आणी आता तर रोडे नावाचे एक व्यक्तीने नगरविकास विभागाने अधिसूचने अधिन स्वतः खरेदी केलेल्या जागेत बांधकाम करीत आसताना फक्त बांधकाम परवाना घेतला नसल्याचे कारण व ग्रामपंचायतला खरेदी खत किंमतीच्या पाच टक्के रक्कम भरणा करुन नमुना नंबर ८ न घेतल्याचे कारण पुढे करीत बांधकाम थांबविण्यासाठी धडपड सुरु केली. त्यामुळे या ग्रामपंचायत चा नियमांचा आडुन मनमानी कारभार सुरु आसल्याचे पुन्हा एकदा दिसुन येत आहे त्यामुळे वरीष्ठांनी या ग्रामपंचायतीच्या कारभावर लवकर आळा घालणे गरजेचं होत आहे.